निर्जनस्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे ! - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:34 AM2021-09-19T04:34:18+5:302021-09-19T04:34:18+5:30

बीड : महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहर व परिसरातील निर्जन स्थळांवर पोलिसांचा वॉच असणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील ...

Desolation has become a den of criminals! - A | निर्जनस्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे ! - A

निर्जनस्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे ! - A

Next

बीड : महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहर व परिसरातील निर्जन स्थळांवर पोलिसांचा वॉच असणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील व शहराजवळील निर्जनस्थळांकडे पोलीस फिरकतच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ही ठिकाणे गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत.

निर्जनस्थळे शोधून तेथे गस्त वाढविण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून पोलिसांना दिलेले आहेत. मात्र, रोजच्या कामाच्या व्यापात अशा निर्जनस्थळांकडे गस्त घालण्यासाठी पोलीस धजावत नाहीत. त्यामुळे मद्यपी व टवाळखोरांना रान मोकळे आहे. काहीजण डोंगरात उघड्यावर बसून मद्यपान करतात काही जण पार्सल जेवण मागवून तेथेच पार्टी करतात. यातून छेडछाड व लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त महत्त्वाची आहे.

....

ही ठिकाणे धोक्याचीच...

कपिलधाररोड

शहराजवळील कपिलधार रस्त्यावर दुतर्फा डोंगर आहे. निसर्गरम्य व धार्मिक स्थळ असल्याने तेथे सतत नागरिकांची वर्दळ असते. मात्र, या परिसरातील डोंगरदऱ्यांत टवाळखोर व मद्यपींचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. काही वेळा अत्याचार व लुटमारीच्या घटनाही होतात.

...

पालवणरोड

शहरानजीक पालवणरोडवर शिवदरा व देवराई ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येईल अशी ही स्थळे. मात्र, या परिसरात गुन्हेगारांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. रात्री-अपरात्री येथे धाक दाखवून लूट होते.

...

दीपमाळ परिसर

शहरातील खंडेश्वरी देवी मंदिराजवळ डोंगरमाथ्यावर खंडोबा मंदिर आहे. तेथे ऐतिहासिक दीपमाळ आहे. दाट झाडीत दिवसभर अन् सायंकाळी मद्यशौकिनांची रेलचेल असते. देवस्थान समितीने पेठ बीड पोलिसांना विनंती करूनही ते फिरकत नाहीत.

.....

....

; '' ? !

जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटना

गुन्ह्याचा प्रकार वर्ष गुन्हे

बलात्कार २०२० १२९

२०२१ ०९८

बाललैंगिक अत्याचार २०२० ७९

२०२१ ०५६

विनयभंग २०२० ३०४

२०२१ २६८

.....

पोलिसांकडे १२ ठिकाणांची यादी

शहर व परिसरातील १२ निर्जनस्थळांची यादी पोलिसांकडे आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीला हटकून त्यांची विचारपूस करण्याचे काम छेडछाड विरोधी पथकाने किंवा गस्तीवरील पोलिसांनी करणे आवश्यक आहे. विशेषत: अल्पवयीन मुले-मुली तेथे कशासाठी आले आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातून संभाव्य घटनांना ''ब्रेक'' बसे शकतो.

....

येथे पोलीस चुकूनही दिसत नाहीत

यात कपिलधार डोंगर परिसर, बिंदुसरा धरण, पाली डोंगर परिसर, चऱ्हाटा रोड, इमामपूररोड, दीपमाळ, कपिलधार डोंगर आदींचा समावेश आहे. शक्ती पथकाच्या या ठिकाणी सतत चकरा असायच्या. मात्र, पथकाच्या कारवाया थंडावल्याने टवाळखोर मोकाट आहेत.

....

महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने सहा उपविभागांत पिंक मोबाइल पथके कार्यान्वित केली आहेत. निर्जनस्थळी गस्त वाढविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. छेडछाड रोखण्यासाठी शक्ती पथकाच्या कारवाया वाढविण्यात येणार आहेत.

- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

....

Web Title: Desolation has become a den of criminals! - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.