पाटोद्यात नव्वदीतल्या आजींचा निवडणूक लढविण्याचा निर्धार; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 03:40 PM2017-09-22T15:40:36+5:302017-09-22T15:41:33+5:30

पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील नव्वदीतल्या आजीने निवडणूक लढण्याचा निर्धार करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Determination to contest the election of the grandfather's granddaughter in Patodad; Gram panchayat filed nomination papers for the election | पाटोद्यात नव्वदीतल्या आजींचा निवडणूक लढविण्याचा निर्धार; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज

पाटोद्यात नव्वदीतल्या आजींचा निवडणूक लढविण्याचा निर्धार; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज

Next
ठळक मुद्देपाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील नव्वदीतल्या आजीने निवडणूक लढण्याचा निर्धार करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. निवडणूक लढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करत त्या आजींनी आज उमेदवार म्हणून नामनिर्देशनसुद्धा दाखल केलं आहे . 

- विलास भोसले 
पाटोदा: मराठवाड्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. म्हणूने तिथे सध्या वातावरणात गारवा आहे. विशेष म्हणजे तिथे सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा  फिवर पाहायला मिळतो आहे. पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील नव्वदीतल्या आजीने निवडणूक लढण्याचा निर्धार करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. निवडणूक लढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करत त्या आजींनी आज उमेदवार म्हणून नामनिर्देशनसुद्धा दाखल केलं आहे . 

तालुक्यात कारेगाव राजकीय दृष्टया संवेदनशील गाव समजलं जातं . गावात बहुतांश अल्पसंख्यांक समाजाचा मतदार आहे . तसंच नव्वद टक्के मतदार अल्पसंख्य आहेत . या वर्षीच्या ग्राम पंचायत निवडणुकीत गावातील प्रभाग क्र. 1 हा मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. हीच संधी साधत शांताबाई दशरथ शेलार या 89 वर्ष वयाच्या आजीने उमेदवारी दाखल केली आहे. गावाचा विकास करण्याचा आपला संकल्प असून मी निवडून येणार अशा आत्मविश्वासपूर्ण  भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

निवडणुकीची तयारी पूर्ण  
निवडणुकीत उभा राहण्यास काय आवश्यक आहे हे जाणत. शांताबाई यांनी जात प्रमाणपत्रही मिळवले आहे.  त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरत त्याची हार्डकॉपी त्यांनी तहसील कार्यालयात जमा केली आहे. यावेळी अतिशय तंदुरुस्त आणी काठी व आधाराशिवाय त्यां तहसीलमध्ये वावरताना दिसत होत्या.

Web Title: Determination to contest the election of the grandfather's granddaughter in Patodad; Gram panchayat filed nomination papers for the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.