विकास, यशाची मोट बांधण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:34 AM2018-10-02T00:34:59+5:302018-10-02T00:35:36+5:30
बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकास व यशाची मोट बांधण्याचे काम आपण करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धारूर येथे आयोजीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजने कामाचे डिजिटल भूमिपूजन व शुभारंभा कार्यक्रमप्रसंगी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकास व यशाची मोट बांधण्याचे काम आपण करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धारूर येथे आयोजीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजने कामाचे डिजिटल भूमिपूजन व शुभारंभा कार्यक्रमप्रसंगी केले
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या ४० कामांचे वडवणी व धारूर तालुक्यातील डिजिटल भुमिपूजन उद्घाटक पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.आर. टी. देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा.प्रीतम मुंडे, आ.भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार आ.सुरेश धस, जि. प. अध्यक्ष सविता गोल्हार, रमेश आडसकर, रमेश पोकळे, बाबूराव पोटभरे, डॉ. स्वरूपसिंह हजारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धारूर व वडवणी तालुक्यात ५४ कोटींची कामे करून म. गांधीजींना अपेक्षित विकास केल्याचे म्हटले. स्व. मुंडेंनी जलसंधारणाची काम करून ऊस तोड कामगाराला ऊस उत्पादक केले. विकास निधी खेचून आणला. आमच्या सरकारने दहा हजार कोटींची राष्ट्रीय महामार्गाची कामे केली. यामुळे दळवळण सुलभ होणार असल्याचे त्या म्हणाल्या. विरोधकांनी केवळ राजकारण केल्याचे त्या म्हणाल्या. या वेळी आ.आर. टी.देशमुख म्हणाले, विकासाची गंगा जिल्ह्यात आली असून, विविध विकास कामांना गती मिळाल्याचे सांगितले. यावेळी खा.प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस, आ.भीमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ मुंडे यांनी केले. अॅड. मोहन भोसले यांनी आभार मानले.
२७ कामांचे डिजिटल भूमिपूजन : कामांसाठी ५४ कोटींचा खर्च
४मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची १२८४.२४ कि.मी लांबीची जवळपास ३५० कामे मंजूर करण्यात आली असून यासाठी जवळपास ७८१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यातील कांही कामे पूर्ण, तर काही प्रगतिपथावर आहेत.
४धारूर व वडवणी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धारूर तालुक्यातील ८ कामे व वडवणी तालुक्यातील १९ कामांचे डिजिटल भूमिपूजन करण्यात आले आहे.
४मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची धारूर तालुक्यातील ५५.९३ किलोमीटरच्या मंजूर असलेल्या ८ कामासाठी जवळपास ३० कोटी, तर वडवणी तालुक्यातील ४५ किलोमीटरच्या १९ कामांसाठी २४ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.