विकासकामे करून दाखवावी लागतात - जयदत्त क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:05 AM2019-10-13T00:05:52+5:302019-10-13T00:06:22+5:30

बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले.

Development works have to be done - Jaydatta Kshirsagar | विकासकामे करून दाखवावी लागतात - जयदत्त क्षीरसागर

विकासकामे करून दाखवावी लागतात - जयदत्त क्षीरसागर

Next

बीड : बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजूने विचार करून खरेदी करतो. तसेच मतदान करताना देखील चौकस बुद्धी ठेऊन मतदान करावे लागते. विकासकामे करून दाखवावी लागतात. ती बोलल्याने किंवा फेकाफेकी केल्याने होत नसतात. बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले.
बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी कॉर्नर बैठका घेत डोंगरपट्टा पिंजून काढला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, सुशिल पिंगळे, पंजाब काकडे, गणेश वरेकर, राणा डोईफोडे, बप्पासाहेब घुगे, तात्या डोईफोडे, अरूण डाके, शिवानंद कदम, डॉ.आंधळे, सखाहरी गदळे, तुळशीराम महाराज, उत्तमराव महाराज, महादेव घुगे आदिंची उपस्थिती होती.
जयदत्त क्षीरसागर म्हणाले, डोंगरपट्ट्यातील बोरफडी येथील ग्रामस्थांनी जेव्हा जेव्हा विकासाच्या कामाची मागणी आणि हट्ट धरला. तेव्हा तेव्हा त्यांच्या मागणीला प्राधान्य देण्याचे काम आपण केले. शिक्षण, आरोग्य आणि डोंगरी भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण केले. मिळालेल्या खात्याच्या माध्यमातून जनतेला आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे काम आपण केले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे म्हणाले की, शिवसैनिकांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आहे. जिवाचे रान करून जयदत्त क्षीरसागरांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे. खांद्यावर बाण घेतलेल्या जयदत्त क्षीरसागरांना थेट मंत्रालयामध्ये पाठवायचे आहे. त्यासाठी आपण मदतीचा खारीचा वाटा उचला असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुशील पिंगळे, डी.एस.कदम, अरूण बोंगाने, साहेबराव पोकळे, परमेश्वर घुमरे, तात्या डोईफोडे, सुरेश घुगे, झुंजार धांडे, लालासाहेब घुगे, विलास कुटे, महादेव घुगे यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सोंगंढोंगं करणाऱ्यांना बाजूला सारा
या निवडणुकीत आपल्याला संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याचे काम आपण करू. या भागातील ऊसतोड मजूर हातात कोयता घेऊन जीवन जगतो. तो कोयता घेणारा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे. विकासकामे जलदगतीने करायची असतील तर सोंगंढोंगं करणाºयांना बाजूला सारा, गट -तट विसरून धनुष्यबाणाला मतदान करा. विकास बोलून होत नाही तो करून दाखवावा लागतो असे यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

Web Title: Development works have to be done - Jaydatta Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.