बीड जिल्ह्यात धोंडराईत दरोडेखोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:45 AM2018-02-13T00:45:42+5:302018-02-13T00:45:50+5:30
गेवराई तालुक्यातील धोंडराई जवळील साखरे वस्तीमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडून धुमाकुळ घातला. चार ते पाच जणांना मारहाण करीत सोने, चांदीसह रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील धोंडराई जवळील साखरे वस्तीमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडून धुमाकुळ घातला. चार ते पाच जणांना मारहाण करीत सोने, चांदीसह रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
तालुक्यातील धोंडराई शिवारातील साखरे वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री धुमाकूळ घालत रहिवाशांना मारहाण करुन सोने, नगदी माल लंपास केला. चोरट्यांनी साखरे वस्तीवर राहणाºया व आपल्या घरात झोपलेल्या कचरू साखरे यांच्या घरात प्रवेश करुन कचरू साखरे, केशरबाई साखरे व नातू बाजीराव दुधसागर यांना मारहाण करून घरातील नगदी रोख २५ हजार रूपये व सोने काढून नेले.
जवळच असलेल्या शिवाजी साखरे, हौसाबाई साखरे यांच्या घरात प्रवेश करुन किरकोळ मारहाण करून घरात ठेवलेले दागिने लंपास केले. चोरट्यांनी आपला मोर्चा जवळच्या तिसºया घरात वळवला. गुलाब मोतीराम निकम, बद्री निकम हे झोपेत असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे साखरे वस्तीवर घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.