धम्मात जगाच्या कल्याणाचा विचार सामावला भिक्खू ज्ञानरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:17+5:302021-02-10T04:34:17+5:30
अंबाजोगाई : चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही ८ फेब्रुवारी २१ रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...
अंबाजोगाई :
चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही ८ फेब्रुवारी २१ रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला भन्ते उपगुप्त महाथेरो (पुर्णा), भिक्खू ज्ञानरक्षीत (औरंगाबाद), भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.
स्वागताध्यक्षपदी प्रा.प्रदिप रोडे हे होते. या धम्म परिषदेला परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनीचे अध्यक्ष अॅड.अनंतराव जगतकर तर यावेळी आ.संजय दौंड यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी चंद्रशेखर वडमारे, भास्कर रोडे, डॉ.विनोद जगतकर, सरपंच बळीराम मिसाळ, उपसरपंच, अभियंता दत्तात्रय भिसे, प्रयागबाई मिसाळ, प्रा.दासुु वाघमारे, परळीभुषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.माधव रोडे यांची उपस्थिती होती. संयोजन समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार सर्व निर्देशांचे पालन केले.
या प्रसंगी बोलताना आ.संजय दौंड यांनी चांदापुर येथील तक्षशिला बौद्धधम्म प्रतिष्ठाणला आपण यापुढील काळात सर्वोतोपरी सहकार्य व मदत करणार असल्याचे सांगुन हा परिसर विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून असे सांगत धम्म परिषदेच्या आयोजनासाठी दरवर्षी २५ हजार रूपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पुज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांनी चांदापुर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याचे सांगुन धम्म उपासकांनी धम्माचे आचरण करून दानाची भावनिकता वाढवावी. धम्म विचाराने परिवर्तन शक्य आहे. यापुढे धम्माचा विचार विस्तीर्ण करण्यासाठी कार्यरत राहू, उत्तम व चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी उपगुप्त महाथेरो म्हणाले. भंते धम्मशील यांनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला लोककल्याणाचा मार्ग सांगितला आहे. बुध्दाचा धम्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे, असे सांगितले. यावेळी भिक्खू ज्ञानरक्षित यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला तथागतांचा शुध्द धम्म दिला. भारतीय संविधानात मानवी कल्याणाचा जो विचार सामावला आहे. तो वंदनीय बाबासाहेबांनी ञिपीटीकातून घेतला आहे. आपल्याला कायद्याने सुरक्षित केले आहे. धम्म विचारांत जगाच्या कल्याणाचे सुख सामावले असल्याचे यावेळी धम्मरक्षित यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले.
स्वागताध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी केले चांदापुर येथे नवे ऊर्जा केेंद्र निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना अॅड.अनंतराव जगतकर यांनी बुद्ध धम्माची महती विषद केली. चारित्र्यसंपन्न व नितीमान समाज निर्माण करण्यााठी धम्म आचरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अॅड.जगतकर यांनी केले. या धम्म परिषदेत १४ विविध महत्वपुर्ण ठराव मांडण्यात येवून ते पारित करण्यात आले.