धम्मासाठी श्रद्धा आणि एकाग्रता आवश्यक - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:24+5:302021-08-24T04:37:24+5:30
बीड : तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे सर्वांना सर्वांगीण बळ देणारा धम्म आहे. आपल्या स्वकर्तृत्वाच्या विचारावर ठाम राहून ...
बीड : तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे सर्वांना सर्वांगीण बळ देणारा धम्म आहे. आपल्या स्वकर्तृत्वाच्या विचारावर ठाम राहून सर्वांप्रती मांगल्याची भावना अंगी बाळगून जो सत्कार्याप्रती कार्य करतो, तो केव्हाही श्रेष्ठ ठरतो. धम्मासाठी श्रद्धा आणि एकाग्रता अंगी असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पू. डॉ.भदंत इन्दवंस महाथेरो, मुंबई यांनी केले.
प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने पू. भदंत आनंद कौसल्यायन नगर, शिवणी ता. जि. बीड येथे श्रावण पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक पू. भिक्खु धम्मशील, प्रमुख अतिथी पाटोदा एसबीआयचे व्यवस्थापक उमेश रोहिदास मस्के, नायब तहसीलदार लता शिरसाट, अरुणा आठवले, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्ष, निवृत्त शिक्षणाधिकारी सखाराम लक्ष्मण रोडे उपस्थित होते.
पुढे बोलताना भदन्त इन्दवंस महाथेरो म्हणाले, आपल्या स्वकर्तृत्वाच्या विचारावर ठाम राहून सर्वांप्रती मांगल्याची भावना अंगी बाळगून जो सत्कार्याप्रती कार्य करतो, तो केव्हाही श्रेष्ठ ठरतो. सम्यक विचार, सम्यक वाणीतून मानवतेचे दर्शन घडते. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या त्यापैकी श्रावण पौर्णिमेस अग्रश्रावक अंगुली मालाची धम्मदीक्षा ही एक होय. याच कार्यकाळात धम्म उपासक-उपासिकांना धम्माचे विचार वर्षावासातून दिले जातात, ही पौर्णिमा म्हणजे धम्म अनुयायांसाठी खूप महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने शिवणी ता. जि. बीड येथे तीन एक्कर जमीन घेण्यात आलेली आहे. येथील विकासकामांसाठी धम्म उपासक-उपासिकांनी स्वेच्छेने जास्तीत जास्त धम्मदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी उपासक आयु. कचरू वाघमारे यांच्याकडून भोजनदान व खीरदान देण्यात आले.
संचालन प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रेमचंद शिरसट यांनी केले. पी. व्ही. बनसोडे यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमास शुभ्र वस्त्र परिधान करून बीड, शिवणी व पंचक्रोशीतील धम्म उपासक-उपासिका, बालक बालिका, धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
220821\140022_2_bed_19_22082021_14.jpeg
धम्मदेसना