माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 06:24 PM2023-05-28T18:24:12+5:302023-05-28T18:29:07+5:30

महाविकास आघाडीची लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल होत आहे.

Dhananjay Munde, For me 'Delhi Abhi Door Hai...', Dhananjay Munde's explanation on viral Lok Sabha list | माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण

माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण

googlenewsNext


बीड- 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या 9 तारखेला पक्षाची अहमदनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी आज बीडमध्ये राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातून पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाच्या विचाराला मानणारे नागरिक अशा सर्वांनी शरद पवारांच्या सभेसाठी अहमदनगरला उपस्थित राहावी, असे आवाहन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

आगामी काळातल्या निवडणुकांच्या व राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्वाची असून, या सभेला अहमदनगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड जिल्ह्यातून देखील हजारो नागरिक संमिलीत व्हावेत, याचे नियोजन करण्यासाठी पूर्व आढावा बैठकीचे आयोजन बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीस आ.धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले, त्याचबरोबर आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.संजय भाऊ दौंड, विजयसिंह पंडित यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

दिल्ली आणखी माझ्यासाठी खूप दूर आहे - धनंजय मुंडे
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत अहमदनगर येथील सभेबाबत माहिती देत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या एका व्हायरल यादीचा संदर्भ देत तुम्ही लोकसभा लढणार का? असा प्रश्न केला, त्यावर धनंजय मुंडे यांनी आपल्यासाठी दिल्ली आणखी खूप दूर आहे, असे उत्तर दिले. 

धनंजय मुंडे म्हणाले की, माझी माझ्या पक्षाला एक कार्यकर्ता म्हणून राज्यात अधिक उपयुक्तता आहे, त्यामुळे पक्ष मला लोकसभा लढायला लावणार नाही. बीड लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने विजयी व्हावे, हे आमचे लक्ष्य आहे, हे निश्चितच सत्य आहे, मात्र मी स्वतः उमेदवार असेल, ही चर्चा पूर्णपणे चुकीची आहे, असे धनंजय मुंडे स्पष्टपणे यांनी सांगितले.

Web Title: Dhananjay Munde, For me 'Delhi Abhi Door Hai...', Dhananjay Munde's explanation on viral Lok Sabha list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.