'पोटी जन्म घेतला की राजकीय प्रश्न कळतातच असं नाही?' बहिणींविरुद्ध भावाचा स्टारप्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:36 PM2019-03-16T18:36:19+5:302019-03-16T18:37:45+5:30

बीड लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठकांना आज पाटोदा येथून सुरूवात झाली.

Dhananjay munde major critics on pritam munde and pankaja munde | 'पोटी जन्म घेतला की राजकीय प्रश्न कळतातच असं नाही?' बहिणींविरुद्ध भावाचा स्टारप्रचार

'पोटी जन्म घेतला की राजकीय प्रश्न कळतातच असं नाही?' बहिणींविरुद्ध भावाचा स्टारप्रचार

बीड - बीडच्या जनतेने एका घराला भरपूर दिले मात्र बीडकरांना काय मिळाले ? 5 पाच वर्षात एकदाही न दिसलेल्या खासदार निधीही खर्च करू शकल्या नाहीत तर त्या दबंग कशा? पोटी जन्म घेतला म्हणून राजकीय प्रश्न कळतातच असं नाही. म्हणूनच, आता शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला व्यक्तीच बीडचा खासदार होणार, असे म्हणत विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक धनंजय मुंडेंनी बहिण प्रतिम मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

बीड लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठकांना आज पाटोदा येथून सुरूवात झाली. पाटोदा नंतर आष्टी आणि रात्री शिरूर येथील बैठकीमधूनही कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात उपस्थित राहत निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे आरंभ केला. बीडच्या जनतेने एका घराला भरभरून प्रेम दिले. मात्र, बीडकरांना काय मिळाले? निवडणुकीत जिंकून आल्यानंतर पाच वर्षात एकदाही दिसल्या नाहीत. पोटी जन्म घेतला म्हणून राजकीय प्रश्न कळतातच असं नाही. दबंगाई होती तर 10 हजार कोटींचा प्रकल्प लातूरला जाऊच का दिला ? म्हणुनच आता सामान्य कुटुंबात आणि शेतकर्‍यांशी नाळ जोडलेला व्यक्तीच खासदार होणार, असा विश्वास धनंजय यांनी व्यक्त केला. 

पक्षाचा आदेश मला अंतिम - अमरसिंह पंडित

काल बीड लोकसभेची उमेदवारी बजरंग बप्पा सोनवणे यांना जाहीर झाल्यानंतर अमरसिंह पंडित हे नाराज असल्याच्या काही लोकांनी वावड्या उठवल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर अमरसिंह पंडित आजच्या बैठकांमधुन काय बोलतात याकडे लक्ष लागले असताना मला पक्षाचा आदेश अंतिम आहे, दिलेला शब्द हा अमर पाळतो. बीड जिल्हा पवारांवर विश्वास ठेवणारा आहे. पक्षाचा निर्णय झाला आता कामाला लागा असा आदेशच कार्यकर्त्यांना देत उमेदवारीवरून उठलेल्या वावड्यांना चोख शब्दात प्रत्युत्तर दिले.

मी जनतेचा पाईक- बजरंग बप्पा सोनवणे

पक्षाने दिलेली उमेदवारी जनतेच्या ताकदीवर पेलण्यास मी तयार असून, जनतेचा पाईक म्हणुन जिल्हा वासियांच्या प्रश्नांवर आवाज उठवेल त्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन, उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केले.
 

Web Title: Dhananjay munde major critics on pritam munde and pankaja munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.