धनंजय मुंडेंवर खापर फोडून धस, क्षीरसागरांपाठोपाठ मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:24 AM2019-10-03T00:24:29+5:302019-10-03T00:25:26+5:30

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेच्या डोक्यावर खापर फोडून आ. सुरेश धस, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागरांपाठोपाठ नंदकिशोर मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर पडले. मुंदडांनी भाजप तर क्षीरसागरांनी शिवसेनेला जवळ केले.

Dhananjay Munde slapped on mundane, mundane after Kshirsagar | धनंजय मुंडेंवर खापर फोडून धस, क्षीरसागरांपाठोपाठ मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर

धनंजय मुंडेंवर खापर फोडून धस, क्षीरसागरांपाठोपाठ मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर

googlenewsNext

बीड : विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेच्या डोक्यावर खापर फोडून आ. सुरेश धस, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागरांपाठोपाठ नंदकिशोर मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर पडले. मुंदडांनी भाजप तर क्षीरसागरांनी शिवसेनेला जवळ केले.
एकेकाळी धनंजय मुंडे, आ. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, नंदकिशोर मुंदडा, रमेश आडसकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे जिल्ह्यावर राष्टÑवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. आता या दिग्गजांंपैकी पंडित आणि धनंजय मुंडे वगळता बाकी सर्वजण बाहेर पडल्यामुळे राष्टÑवादीची अवस्था कमकुवत झाली आहे. राष्टÑवादीतून बाहेर पडताना या सर्व मंडळीनी धनंजय मुंडेंच्या गटबाजीला कंटाळून आम्ही बाहेर पडत आहोत, असे म्हटले होते. राष्टÑवादीचा फोडाफोडीचा फॉर्म्युुला जिल्ह्याच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावरच उलटवत जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे काबीज केली. आज बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. बीडचा मतदारसंघ राष्टÑवादीच्या ताब्यात होता. परंतु, जयदत्त क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्टÑवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. राष्टÑवादीप्रमाणेच बीड जिल्ह्यातील शिवसेनेलाही उतरती कळा लागली होती परंतु, क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. क्षीरसागरामुळे बीड जिल्ह्यातील महायुतीचीही ताकद वाढली आहे. कारण क्षीरसागरांना मानणारा मोठा मतदारवर्ग जिल्ह्यात आहे. अनेक संस्था ताब्यात असल्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी मोठी यंत्रणा आज त्यांच्या ताब्यात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, नंदकिशोर मुंदडा, रमेश आडसकर आणि इतर मंडळींशी जयदत्त क्षीरसागर यांचा चांगला समन्वय आहे. भाजपने माजलगावमध्ये विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांना बदलून रमेश आडसकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे मोहन जगताप बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. तसे घडले तर त्याचा फटका भाजपाला बसू शकतो. राष्टÑवादीत बंडखोरीची शक्यता नाही. अपेक्षेप्रमाणे सर्वांनाच उमेदवारी मिळाली आहे. केजमध्ये नमिता मुंदडा यांना शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, नमिता यांनी भाजपत प्रवेश केला आहे. ज्यांनी स्थापनेपासून राष्टÑवादीत येऊन तीन वेळा आणि भाजपकडून दोन वेळा विधानसभेवर निवडून आल्या, त्या माजी मंत्री विमल मुंदडा यांचे घराणे भाजपात गेले आहे. नमिता मुंदडा यांना भाजपाची उमेदवारी जवळपास मिळाल्यातच जमा आहे. केजमध्येही नमिता मुंदडा यांच्यासाठी भाजपाने विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांची उमेदवारी नाकारल्यात जमा आहे. भाजपने पाचपैकी दोन विद्यमान आमदारांची उमेदवारी कापून क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.

Web Title: Dhananjay Munde slapped on mundane, mundane after Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.