धनंजय मुंडेंचा 'सेल्फी विथ रोड'; परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित बायपासचे काम पूर्णत्वाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 04:12 PM2022-06-04T16:12:26+5:302022-06-04T16:15:15+5:30

परळी शहर बायपास हा दोन टप्प्यात विभागलेला असून, अवजड वाहतुकीच्या दृष्टीने हा बायपास अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

Dhananjay Munde's 'Selfie with Road'; Towards completion of pending bypass work of Parli | धनंजय मुंडेंचा 'सेल्फी विथ रोड'; परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित बायपासचे काम पूर्णत्वाकडे

धनंजय मुंडेंचा 'सेल्फी विथ रोड'; परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित बायपासचे काम पूर्णत्वाकडे

Next

परळी (बीड) : परळी शहर वासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बायपासचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. आज मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना, अचानक थांबून कामाची पाहणी केली. यावेळी काम अत्यंत वेगाने, दर्जात्मक पद्धतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. एवढेच नव्हे तर मंत्री मुंडे यांना आपण केलेल्या प्रयत्नांचे फलित पाहून, या रस्त्यावर उभारून सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. 

सामाजिक न्यायमात्न्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी शहर बायपासचा एक टप्पा आता पूर्णत्वाकडे आला आहे. परळी शहर बायपास हा दोन टप्प्यात विभागलेला असून, अवजड वाहतुकीच्या दृष्टीने हा बायपास अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. पहिल्या टप्प्यात कन्हेरवाडी ते टोकवाडी या चार किलोमीटर लांबीच्या चार पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

यासाठी 54 कोटी रुपये निधी खर्च अपेक्षित आहे. मे. यश कन्स्ट्रक्शन या कंपनी मार्फत या रस्त्याचे काम सुरू असून रेल्वे ओव्हर ब्रिज वगळता सुमारे 80% काम पूर्णत्वाकडे आले आहे. मागील वर्षी 3 जुलै रोजी धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात टोकवाडी ते संगम या रस्त्याचे सुमारे पावणे तीन किलोमीटरचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. 

Web Title: Dhananjay Munde's 'Selfie with Road'; Towards completion of pending bypass work of Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.