धनंजय मुंडेंचे कर्मभूमीत जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:05 AM2020-01-11T00:05:21+5:302020-01-11T00:06:16+5:30

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कर्मभूमी असलेल्या परळी शहरात शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान आल्यानंतर धनंजय मुंडे यांचे उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Dhananjay Munde's warm welcome | धनंजय मुंडेंचे कर्मभूमीत जोरदार स्वागत

धनंजय मुंडेंचे कर्मभूमीत जोरदार स्वागत

Next
ठळक मुद्देफटाक्यांची आतिषबाजी, विद्युत रोषणाई, उभारल्या कमानी : चार राज्यातून आली होती परळीत बँडपथके

परळी : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कर्मभूमी असलेल्या परळी शहरात शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान आल्यानंतर धनंजय मुंडे यांचे उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी व विद्युत रोषणाई करून मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयास पुष्पहार घालून वंदन केले. त्यानंतर त्यांचे सुशिल कराड यांनी क्र ेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून असे स्वागत केले. त्यानंतर त्यांची शहराच्या प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक व मध्यप्रदेश येथून आलेले बॅन्ड पथक होते. देशभक्तीपर गीत गाऊन धनंजय मुंडे यांचे त्यांच्या चाहत्यांनी स्वागत केले.
शुक्रवारी सकाळपासूनच मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली.
येथील मोंढा मार्केट भागात त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणूक निघाली. या मिरवणूकीत आ.प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, संजय दौंड, अजय मुंडे, यांच्यासह इतर मान्यवर होते. शिवाजी चौकात युवक, महिला व चाहत्यांची विक्रमी गर्दी झाली होती. ‘धनंजय मुंडे आगे बढो’ च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. सायंकाळी कारने बीडमार्गे परळीकडे मुंडे यांचे आगमन झाले. परळी तालुक्यातील पांगरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून धनंजय मुंडे यांनी दर्शन घेवून आशिर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी वडील स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले.

Web Title: Dhananjay Munde's warm welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.