धारूरचे कोविड केअर सेंटर हाऊसफुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:31 AM2021-04-12T04:31:43+5:302021-04-12T04:31:43+5:30
धारूर : येथे सुरू केलेल्या १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सहाच दिवसांत हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे नव्याने दाखल ...
धारूर : येथे सुरू केलेल्या १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सहाच दिवसांत हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना कुठे ठेवायचे? असा प्रश्न यंत्रणेपुढे आहे. येथील खाटांची संख्या तत्काळ वाढवावी, अशी मागणी होत आहे.
धारूर येथे ३ एप्रिलपासून ५० खाटांचे कोविड केअर सेंटर समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये सुरू करण्यात आले. तिसऱ्याच दिवशी येथील खाटांची संख्या शंभर करण्याची पाळी आली. दैनंदिन पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या ही दोन अंकामध्ये असल्याने सहाव्या दिवशीच कोविड केअर सेंटर हाऊसफुल झाले. त्यामुळे या कोविड केअर सेंटरसमोर असणारे जिल्हा परिषद शाळेच्या मुलींच्या वसतिगृहाची इमारत ताब्यात घेऊन या ठिकाणी खाटा उपलब्ध करण्याची स्थानिक प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
===Photopath===
110421\img_20210410_180711_14.jpg