धारूरचे कोविड केअर सेंटर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:05+5:302021-09-03T04:35:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर १ सप्टेंबरपासून बंद करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी दिली.
तालुक्यात दुसऱ्या लाटेचा वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहून २ एप्रिल २०२१ पासून शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. पहिल्या लाटेपेक्षा बाधितांची संख्या वाढल्याने ४० खाटांवरून ३०० खाटांपर्यंतची व्यवस्था आरोग्य विभागाने केली होती. राज्यासह जिल्ह्यात दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याने हळूहळू वाढीव कोविड सेंटर बंद करण्यात येत आहेत.
३१ ऑगस्टपर्यंत येथील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृह कोविड सेंटर सुरू होते. मात्र १ सप्टेंबरपासून हे कोविड सेंटर बंद करण्यात आले असून, आता तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची व्यवस्था केज तालुक्यातील पिसेगाव येथील कोविड सेंटरवर करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी दिली आहे.
दुसऱ्या लाटेत धारूर कोविड सेंटर
३ एप्रिल ते १ सप्टेंबर
एकूण दाखल बाधितांची संख्या - २२७१
बरे होईन घरी गेलेले - १६०५
उपचारासाठी हलवलेले - ४०५
गृह विलगीकरण - २६१
मृत्यू ०
---------