बीड जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:16 AM2019-08-14T00:16:17+5:302019-08-14T00:16:48+5:30

ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य पातळीवर सुरु असलेल्या आंदोलनांतर्गत मंगळवारी येथील जिल्हा परिषदेसमोर जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले.

Dharna agitation of village workers in front of Beed Zilla Parishad | बीड जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

बीड जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

Next

बीड : ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य पातळीवर सुरु असलेल्या आंदोलनांतर्गत मंगळवारी येथील जिल्हा परिषदेसमोर जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले. तर मागण्या मान्य न झाल्यास २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यभर असहकार व काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६राज्य संघटना व जिल्हा शाखेच्या माध्यमातून शासनपातळीवर वारंवार प्रयत्न केलेला आहे. मागण्या मान्य न झाल्याने ९ आॅगस्टपासून वेगवेगळ्या टप्प्यावर ग्रामसेवक संघटनेने असहकार व काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करुन फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी. ग्रामसेवक संवर्गाला प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदलून पदवीधर ग्रामसेवक नेमणूक व्हावी, २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सज्जे तसेच पदे वाढवावीत, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करावी. २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करणे, आदर्श ग्रामसेवक राज्य, जिल्हास्तर आगाऊ वेतनवाढ करुन एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करणे, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करणे या मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेसामेर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, जिल्हा सरचिटणीस भगवानराव तिडके, मधुकर शेकळे, एस. के. देशमुख, बी. जी. राठोड, मधुकरराव चोपडे, मनोहर जाधव, डी.बी. मिसाळ, दत्तात्रय नागरे,एस.एम. चव्हाण, ए.व्ही. पुजारी यांच्यासह तालुक्यांचे पदाधिकारी, ग्रामसेवकआंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Dharna agitation of village workers in front of Beed Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.