धारूर बसस्थानक बनले गैरसोयीचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:36 AM2021-08-22T04:36:39+5:302021-08-22T04:36:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : येथील बसस्थानक हे सर्व गैरसोयीचे आगार बनले आहे. बसस्थानकातील रस्ता उखडला आहे. कचरा साठला ...

Dharur bus stand became an inconvenient depot | धारूर बसस्थानक बनले गैरसोयीचे आगार

धारूर बसस्थानक बनले गैरसोयीचे आगार

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : येथील बसस्थानक हे सर्व गैरसोयीचे आगार बनले आहे. बसस्थानकातील रस्ता उखडला आहे. कचरा साठला आहे. यामुळे दुर्गंधी सुटली असून प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

धारूर येथील बसस्थानक हे सध्या विविध समस्यांचे आगार बनले आहे. बसस्थानकात एसटी बस मागे पुढे करताना सर्व डांबरीकरण उखडल्यामुळे येथील दगड उडून प्रवाशांना कधी लागेल हे सांगता येत नाही. बसस्थानकाचा परिसर घाणीच्या साम्राज्यामुळे वेढला आहे. आसपासचे व्यावसायिक ही याठिकाणी घाण आणून टाकतात. बसस्थानकाच्या बाजूच्या मोकळ्या जागेत बाभळबन तयार झाले आहे. येथील शौचालयाची दुरवस्था आहे. बसस्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही. सर्व समस्यांनी वेढलेल्या या बसस्थानकाकडे मात्र एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या समस्यांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत. तरी या बसस्थानकाची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

....

धारूर बसस्थानकास सध्या समस्यांनी वेढले आहे. यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. घाणीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तरी बसस्थानकातील प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.

-अतुल शिनगारे,सकल मराठा समाज संघटना.

....

धारूर बसस्थानकावर प्रवाशांना येणाऱ्या समस्यांबाबत आपण वरिष्ठांना कळवू. याबाबत आपण पत्रव्यवहार केला आहे.

-शंकर स्वामी, आगारप्रमुख, धारूर.

....

210821\img-20210820-wa0124.jpg~210821\img-20210820-wa0123.jpg

धारूर बसस्थानकात एस टी बस मागे पुढे करताना प्रवाशाना डांबरीकरण उखडाल्याने दगड उडून लागण्याची भिती~धारूर बसस्थानकिची दुरावस्था

Web Title: Dharur bus stand became an inconvenient depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.