धारूरमध्ये नगर परिषदेनेच भरवला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:25+5:302021-04-24T04:34:25+5:30

धारूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी शासन वेळोवेळी निर्देश देत आहे. जीवनावश्यक व मोजके व्यवसाय ...

In Dharur, the city council filled the weekly market | धारूरमध्ये नगर परिषदेनेच भरवला आठवडी बाजार

धारूरमध्ये नगर परिषदेनेच भरवला आठवडी बाजार

Next

धारूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी शासन वेळोवेळी निर्देश देत आहे. जीवनावश्यक व मोजके व्यवसाय सोडता, इतर व्यवसाय बंद केले आहेत. भाजीपाला व फळ विक्रेत्यांना विक्रीची परवानगी शिथिल काळात आहे. महिन्याभरापूर्वी आठवडी बाजार बंदचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे. मात्र येथील स्थानिक नगर परिषद प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलत चक्क सोमवार व शुक्रवारचा आठवडे बाजार भरवून कोरोना संसर्गाला निमंत्रण दिल्याचे दिसून येते.

शहरातील हनुमान चौकात मुख्य रस्त्यावर रोजच भाजीपाला व फळ विक्रेत्यांची गर्दी होत होती. धारूर शहर पालिका व तालुका प्रशासन याबाबत ठोस भूमिका घेत नव्हते. यामुळे शहरातील जागृत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात फिरून भाजीपाला व फळविक्री करण्यास परवानगी देऊन एका ठिकाणी होणारी गर्दी थांबवावी, आशी मागणी केली होती. तहसील, नगर परिषद व पोलीस प्रशासनाने धारूरमध्ये चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत आठवडी बाजाराच्या ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रेत्यांना बसविण्याचे नियोजन सोशल डिस्टन्सनुसार केले. मात्र या ठिकाणी आठवडी बाजारात गर्दी वाढली. राज्य शासनाने निर्बंध कडक केल्यावरही २३ एप्रिलरोजी शुक्रवारी मोठा बाजार भरवण्यात आला होता. कडक लॉकडाऊन असताना, या ठिकाणी गर्दी झाली. प्रशासनाकडूनच चुकीच्या नियोजनामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास निमंत्रण देण्याचा प्रकार झाला. यामुळे नागरिकांत मात्र भीती निर्माण झाली. शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीसाठी प्रशासनाने गल्ली-बोळात फिरुन विक्रीचे व्यवस्थित नियोजन करावे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन टाळणे गरजेचे आहे.

अधिकाऱ्यांकडून दुजोरा, बाजार बंद करणार

भरलेल्या बाजाराबाबत तहसीलदार वंदना शिडोळकर यांना विचारले असता, त्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला असून, लवकरच हा आठवडे बाजार बंद करण्याची ग्वाही दिली. तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी तहसील व पोलीस प्रशासनाच्या निर्देशानुसार तसेच नागरिकांच्या मागणीमुळे मोकळ्या जागेत सोशल डिस्टन्सचा नियम पाळून बाजार भरवत असल्याचे सांगितले. लवकरच हा बाजार बंद करू, असे त्यांनीही सांगितले.

===Photopath===

230421\anil mhajan_img-20210423-wa0065_14.jpg

Web Title: In Dharur, the city council filled the weekly market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.