राज्यात पहिले आयएसओ मानाकंन होणारे धारूरचे वनपरिक्षेत्र कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:32+5:302021-01-15T04:28:32+5:30
धारूर : येथील वनपरिक्षेत्र कार्यालय हे राज्यातील पहिले तालुकास्तरीय आयएसओ मानाकंन प्राप्त कार्यालय ठरणार असून या कार्यालय परिसराचा चेहरामोहरा ...
धारूर
: येथील वनपरिक्षेत्र कार्यालय हे राज्यातील पहिले तालुकास्तरीय आयएसओ मानाकंन प्राप्त कार्यालय ठरणार असून या कार्यालय परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. धारूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय आयएसओ मानाकंनाच्या स्पर्धेत उतरले होते. सहा महिन्यांतच या कार्यालयाचा चेहरामोहरा बदलला आहे. सर्व्हे नंबर ३७८ मध्ये तीन एकर क्षेत्रांत कार्यालय, इमारत व निवासस्थाने आहेत. येथील तालुका न्यायालयाच्या इमारती शेजारी असलेल्या या वनपरिक्षेत्र कार्यालयाचा परिसर सुंदर व आकर्षक बनला आहे. सर्व परिसराला तारेचे कंपौंड केले आहे. डोंगराळ भाग असतानाही झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. कार्यालयाचा बाह्य भाग आकर्षक केला आहे. येथील कार्यालयाचे सर्व व्यवस्थापन बदलून सर्व खातेप्रमुखांचे स्वतंत्र कक्ष, कार्यालयात स्वच्छता, टेबल, खुर्च्या, पडदे ,कागदपत्रांची मांडणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाहनतळ, ध्वजस्तंभ, झाडांची सजावट, कर्मचाऱ्यांचे जॉब प्रोफाईल आकर्षक करून कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड, सर्व कार्यालयीन कागदपत्रे, फाईली व दस्तावेजाची अद्ययावत मांडणी करण्यात आली आहे. येथे नव्याने आलेले वनपाल शंकर वडवटे यांनी पुढाकार घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या कार्यालयाचे रूपडे पालटले आहे.