धारूर-मुंबई बसला एका फेरीत ६९ हजारांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:51+5:302021-08-24T04:37:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : रापमच्या धारूर आगारातून जाणाऱ्या धारूर-मुंबई बसने एका फेरीत ६९ हजार ३७० रुपये विक्रमी उत्पन्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : रापमच्या धारूर आगारातून जाणाऱ्या धारूर-मुंबई बसने एका फेरीत ६९ हजार ३७० रुपये विक्रमी उत्पन्न मिळविले असून, या बसच्या वाहक व चालकांचा धारूर आगाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
धारूर आगारातून जाणाऱ्या धारूर-मुंबई या नियताचे एका फेरीत ६९ हजार ३७० रुपये उत्पन्न मिळाले. रापमला चांगले उत्पन्न मिळविण्यात धारूर आगाराने जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. धारूर-मुंबई बसचे एका फेरीत चांगले उत्पन्न मिळविल्याबद्दल चालक राम वीर, शेख शौकत, वाहक विजय शिरडोळे व महंमद खुरेशी यांचा आगारप्रमुख शंकर स्वामी, अजय सोनटक्के आदींनी सत्कार केला. यावेळी रापम कर्मचारी उपस्थित होते.
230821\img-20210823-wa0055.jpg
धारूर आगारात धारूर मुंबई गाडीचे विक्रमी उत्पादन आणणाऱ्या वाहक व चालकाचा सत्कार