धारूर पं.स.ला हातपंप दुरूस्तीची गाडी मिळाली; सभापती, उपसभापतींचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:35+5:302021-02-10T04:33:35+5:30
गट विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत पत्रव्यवहार करून थकलेल्या सभापती चंद्रकला हनुमंत नागरगोजे व उपसभापती प्रकाश कोकाटे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी ...
गट विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत पत्रव्यवहार करून थकलेल्या सभापती चंद्रकला हनुमंत नागरगोजे व उपसभापती प्रकाश कोकाटे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १० फेब्रुवारी २०२१ रोजी चक्क जि.प. बीड समोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, वाघमोडे (कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा,बीड) यांनी ९ फेब्रुवारी २०२१ रोजी धारूर पंचायत समितीला हातपंप दुरूस्तीचे वाहन व कर्मचारी पाठवले आहेत.
सदरील वाहन तात्काळ मिळावे म्हणून आ. प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे, हनुमंत नागरगोजे, पं.स.सदस्या आशालता उमाकांत सोळंके, बाळासाहेब मोरे, गट विकास अधिकारी आर.एस.कांबळे यांनी प्रयत्न केले होते.
हातपंप दुरूस्ती वाहन व कर्मचारी धारूर पंचायत समिती येथे हजर होतात वाहनाची पुजा व कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा.ईश्वर मुंडे, हनुमंत नागरगोजे, प्रकाश कोकाटे, सरपंच मच्छिंद्र तिडके, अशोक तिडके, भागवत गव्हाने, महेश तिडके, सचिन थोरात, सतिष पोतदार,रवि गायसमुद्रे, पाणी पुरवठा विभागाचे पवार व ईतर कर्मचारी उपस्थित होते.