डायल केला ११२ क्रमांक, पोलिस आले ८.४० मिनिटांत
By सोमनाथ खताळ | Published: February 8, 2024 07:29 AM2024-02-08T07:29:43+5:302024-02-08T07:29:59+5:30
तत्पर सेवा : मीरा भाईंदरमध्ये सर्वांत जलद, तर धुळे जिल्ह्यात सर्वांत उशिराने मिळाली मदत; साडेअकरा लाख लोकांचे कॉल
सोमनाथ खताळ
बीड : सामान्य नागरिक कोणत्याही अडचणीत असेल तर त्याने डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले होते. २०२३ या वर्षात ११ लाख ४५ हजार लोकांनी यावर संपर्क साधून मदत घेतली. यावर पोलिसही सतर्क असल्याचे दिसले. कॉल आल्यानंतर पोलिसांनी ८ मिनिटे ४० सेकंदांत संबंधिताला मदत केली आहे. राज्यात ३ मिनिटे २५ सेकंदांत अशी सर्वांत जलद सेवा मीरा भाईंदरमध्ये, तर सर्वांत उशिरा धुळे जिल्ह्यात मिळाली आहे. येथील पोलिसांचा मदतीचा वेळ हा १५ मिनिटे २२ सेकंद एवढा आहे.
महिलांच्या संबंधित जास्त तक्रारी
डायल ११२ या क्रमांकावर सर्वांत जास्त तक्रारी या महिलांच्या संबंधित आहेत. त्यातही घरगुती वादाचे प्रकार अधिक आहेत.
प्रत्येक ठाण्यात ‘एमडीटी’ मशिन
nराज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात डायल ११२ यासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत, तसेच मुख्यालयाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष आहे.
nप्रत्येक पोलिस ठाण्यात २ ते १० एमडीटी (मोबाइल डेटा टर्मिनल) मशीन दिलेल्या आहेत. यावर कॉल येताच संबंधित पोलिस मदतीसाठी रवाना होतात.
दिशाभूल केल्यास गुन्हा
nडायल ११२ वर अनेक कॉल हे फेक किंवा पोलिसांशी संबंधित नसतात. हे कॉल निकाली काढले जातात; परंतु अनेकदा पोलिसांची मुद्दामहून दिशाभूल केली जाते.
nकाही दिवसांपूर्वी बीडमध्ये पोलिसांची दिशाभूल करणारा फोन आला होता. असे दिशाभूल करणारे कॉल करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
‘बायको नांदत नाही’
माझी बायकोच नांदत नाही, बस चालकांनी बसच थांबवली नाही, शेजाऱ्यांचे सांडपाणी आमच्या दारासमोर येत आहे, आमच्या नळाला पाणी कधी येणार, आमच्याकडे घंटागाडीच येत नाही, परिसरातील वीज गेली, अशा तक्रारीही ११२ क्रमांकावर येतात.
कोठून किती कॉल अन् मदत कधी?