मुलाचे बँकेत खाते उघडले काय? विविध योजनांचा मिळणार नाही लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:44+5:302021-09-27T04:36:44+5:30

१) जिल्ह्यात पहिली ते आठवीचे खाते उघडलेले विद्यार्थी - १५४०४७ खाते न उघडलेले विद्यार्थी - १७७०५८ २) तालुकानिहाय स्थिती ...

Did the child open a bank account? You will not get the benefit of various schemes! | मुलाचे बँकेत खाते उघडले काय? विविध योजनांचा मिळणार नाही लाभ!

मुलाचे बँकेत खाते उघडले काय? विविध योजनांचा मिळणार नाही लाभ!

Next

१) जिल्ह्यात पहिली ते आठवीचे खाते उघडलेले विद्यार्थी - १५४०४७

खाते न उघडलेले विद्यार्थी - १७७०५८

२) तालुकानिहाय स्थिती काय?

तालुका खाते उघडले न उघडलेले

अंबाजोगाई २०७५९ १३८४१

परळी २२३४२ १४८९५

बीड २९५१० ४४१५९

केज १३५६५ १७२८५

वडवणी ३५५६ ८२५७

शिरूर ८५०० ५५२२

गेवराई २२८६५ १५२३४

माजलगाव ६३४१ २४३६४

पाटोदा ५६११ ८९११

आष्टी १६४८५ १३०१३

धारूर ४५१२ १०५२८

एकूण १५४०४७ १७७०५८

३) या योजनांच्या लाभासाठी बॅंक खाते आवश्यक

शासनामार्फत मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती, सवलती, प्रवास भत्ता, विविध योजनांतील डीबीटी लाभाची मिळणारी रक्कम जमा करण्यासाठी बँक खाते आवश्यक असते. ही रक्कम शासन निर्देशानुसार संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात ऑनलाइन जमा होते. यासाठी बँक खाते आवश्यक असते. पालकांनी त्यांच्या पाल्यांचे बँक खाते लवकरात लवकर उघडावेत, शिक्षकांनी पाठपुरवा करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, शालेय पोषण आहार अधीक्षक अजय बहीर यांनी केले आहे.

४) अडचणी काय?

कोरोनामुळे दीड वर्षे शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षकांची इच्छा असली तरी वेळेत त्यांना विद्यार्थी व पालकांशी संपर्क होत नाही. यातच योजनेतून विद्यार्थ्याला मिळणाऱ्या लाभाची रक्कम पाहता तुटपुंजी आहे. किमान १६५ तर कमाल ३०० रुपयांपर्यंत रक्कम जमा होणार आहे; परंतु यासाठी बँक खाते उघडायचे म्हटले तर दिव्य पार पाडावे लागतात. खाते उघडण्यासाठी किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक व खर्च येतो. कमी रक्कम व ती एक वेळ मिळणार असल्याने पालकांमध्ये उदासीनता आहे.

-------------

Web Title: Did the child open a bank account? You will not get the benefit of various schemes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.