कोरोना टेस्ट केली का? शुक्रवारपर्यंत चाचणी करून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:51+5:302021-04-20T04:34:51+5:30
धारूर : बाजारात बसलेल्या प्रत्येक पालेभाजी व फळ विक्रेत्यांनी कोरोना टेस्ट केली का? नसेल तर शुक्रवारपर्यंत चाचणी करून ...
धारूर : बाजारात बसलेल्या प्रत्येक पालेभाजी व फळ विक्रेत्यांनी कोरोना टेस्ट केली का? नसेल तर शुक्रवारपर्यंत चाचणी करून घ्या, असे आवाहन करीत येथील नगर परिषदेची यंत्रणा व यूथ क्लबकडून पालेभाज्या विक्रेत्यांना आखणी करून दिलेल्या ठिकाणीच बसण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे बाजारात विक्रेत्यांनी भाजी विकताना व नागरिकांनी खरेदी करताना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाचे पालन करत ठरवून दिलेल्या वेळेनुसार पालेभाजी, फळविक्रेते व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद करत प्रशासनास सहकार्य केले. यावेळी पोलीस प्रशासनाने शहरात फेरी काढून कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केले. गेल्या सहा आठवड्यांपासून नगर परिषद, तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन व किल्ले धारूर यूथ क्लबने एकत्रित येत कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन केले. त्यानुसार धारूर नगर परिषदेचे कर्मचारी माणिक लोखंडे, सचिन डावकर, बजरंग शिनगारे, माणिक गायसमुद्रे व अन्य कर्मचाऱ्यांनी सकाळी ६ वाजेपासून परिश्रम घेतले. यावेळी किल्ले धारूर युथ क्लबचे सचिव रवि गायसमुद्रे, माजी अध्यक्ष विजय शिनगारे, महादेव देशमुख, सुहास शिनगारे, सुनील गैबी यांनी प्रशासनाबरोबर बाजार तळावर नागरिकांना शिस्त लावण्याबाबत व नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करत प्रशासनाला सहकार्य केले.
===Photopath===
190421\img-20210419-wa0109_14.jpg