बीडच्या क्षयरोग कार्यालयात डिजिटल एक्स-रे मशीन कार्यान्वित - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:39 AM2021-08-17T04:39:02+5:302021-08-17T04:39:02+5:30
बीड : क्षयरोग संशयित रुग्णांना आता एक्स-रे काढण्यासाठी खासगीत जाण्याची गरज नाही. बीडच्या क्षयरोग कार्यालयात १५ लाख रुपये ...
बीड : क्षयरोग संशयित रुग्णांना आता एक्स-रे काढण्यासाठी खासगीत जाण्याची गरज नाही. बीडच्या क्षयरोग कार्यालयात १५ लाख रुपये खर्च करून डिजिटल एक्स-रे मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात क्षयरोग संशयित रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात असते. त्यांना आजार आहे की नाही, हे निष्पन्न करण्यासाठी एक्स-रे काढण्याची गरज असते. आतापर्यंत रुग्णांना खासगीत जावा लागत होते. यासाठी ५०० ते ८०० रुपये खर्च यायचा ; परंतु आता ही सुविधा क्षयरोग कार्यालयातच उपलब्ध झाली आहे. १५ लाखांची डिजिटल एक्स-रे मशीन कार्यान्वित केली आहे. लोकार्पण सोहळ्याला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, डॉ. ज्ञानेश्वर निपटे, विजय कारगुडे, किशोर चव्हाण, सलीम पठाण, शिवाजी बहिर, साधना मस्के, राजेश धुताडमल, संतोष लाड, नरेंद्रकुमार पालीमकर आदींची उपस्थिती होती.