अटृल गुन्हेगारास दिंद्रुड पोलिसांनी पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:33+5:302021-07-17T04:26:33+5:30

धारुर तालुक्यातील कासारी येथील राहीबाई बालासाहेब बडे या महिलेस १० जुलै २०१९ रोजी बालासाहेब व्‍यंकटी बडे व बबन ऊर्फ ...

Dindrud police chased and caught the unsuspecting criminal | अटृल गुन्हेगारास दिंद्रुड पोलिसांनी पाठलाग करून पकडले

अटृल गुन्हेगारास दिंद्रुड पोलिसांनी पाठलाग करून पकडले

Next

धारुर तालुक्यातील कासारी येथील राहीबाई बालासाहेब बडे या महिलेस १० जुलै २०१९ रोजी बालासाहेब व्‍यंकटी बडे व बबन ऊर्फ शाहूराज व्‍यंकटी बडे यांनी विष पाजून खून केल्याची तक्रार मृत राहीबाईचा भाऊ राजेभाऊ बिबीशन तिडके यांनी दिली होती. या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला बबन ऊर्फ शाहूराज व्‍यंकटी बडे हा आरोपी गोपनीय माहितीच्या आधारे दिंद्रुड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या पथकाने शुक्रवारी दुपारी पकडला.

शाहूराज बडे हा शेतातील चिखलातून जवळपास पाच किमी पोलिसांना गुंगारा देत पळत होता. तब्बल बारा पोलीस कर्मचारी त्याचा पाठलाग करीत होते, शेवटी त्याच्या मुसक्या आवळण्यात दिंद्रुड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही कारवाई दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलीस नाईक संजय मुंडे, संतोष बदने, पोलीस अंमलदार संतोष सरवदे, विष्णू घोळवे, आकाश जाधव, नवनाथ लटपटे, महिला पोलीस बाबई चोलेसह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस हेड एस. एम. उबाळे, पोलीस नाईक गायकवाड, कदम, आदींनी केली.

तब्बल चार गुन्हे होते दाखल

बबन (शाहूराज) व्‍यंकटी बडे हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर कासारी परिसरात चार दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी आपली राहती जागा बदलत असल्यामुळे दिंद्रुड पोलिसांची नाकीनऊ आले होते. मोठ्या शिताफीने आरोपीस पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या अटकेनंतर कासारी येथील ग्रामस्थांनी दिंद्रुड पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

160721\sanotsh swami_img-20210716-wa0057_14.jpg

Web Title: Dindrud police chased and caught the unsuspecting criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.