तलावात उतरून केले ‘डुबकी’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:20+5:302021-09-18T04:36:20+5:30
बीड : पाटोदा तालुक्यातील मौजे बांगरवाडी येथील साठवण तलावाच्या सांडव्याला वर्षभरापासून मोठे भगदाड पडले असून, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ...
बीड : पाटोदा तालुक्यातील मौजे बांगरवाडी येथील साठवण तलावाच्या सांडव्याला वर्षभरापासून मोठे भगदाड पडले असून, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्याला धोका निर्माण होऊ शकतो. वेळोवेळी मागणी करूनदेखील प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे तलावात उतरून शेतकऱ्यांनी अनोखे ‘डुबकी’ आंदोलन गुरुवारी केले.
दुरुस्ती करण्यात आली नाही तर अपघाताचा धोका कायम आहे. तलावाखालील गावांतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, संबंधित प्रकरणात तलावाच्या दुरुस्तीसाठी विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच तात्काळ तलाव दुरुस्ती करावी या मागणीसाठी पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ. गणेश ढवळे, लक्ष्मण सस्ते, बंडोपंत काळे, पोपट काळे, सुरेश सस्ते, बारीकराव काळे, भाऊसाहेब काळे, कृष्णा तांबारे, गणेश काळे, तुकाराम सस्ते, उत्तम काळे, पांडुरंग रूपनर, देवीदास काळे आदींनी सहभाग घेतला होता.
160921\443916_2_bed_19_16092021_14.jpg
तलवातील डुबकी आंदोलन करताना गावकरी