बाजार समितीच्या संचालकांना म. फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:54+5:302021-08-14T04:38:54+5:30
माजलगाव : शासनाने २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेतून बाजार ...
माजलगाव : शासनाने २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेतून बाजार समितीचे संचालक व जिल्हा स्तरावरील संस्थांच्या संचालकांना वगळण्यात आले आहे. त्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी पणन व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बाजार समितीचे संचालक व जिल्हा स्तरावरील सहकारी संस्थांच्या संचालकांना वगळण्यात आले आहे. सहकारी संस्थांवर निवडून येणारे संचालक हे मोठ्या प्रमाणावर अल्पभूधारक आहेत. त्यामुळे अशा घटकांना विषयांकित कर्जमाफी योजनेतून वगळणे हे अन्यायकारक असल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ या संचालक मंडळाला व्हावा, अशी मागणी डक यांनी पणनमंत्र्यांकडे केली आहे.