महावितरण कार्यालय परिसरात घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:30+5:302021-02-10T04:34:30+5:30

अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा बीड : शहरातील जालना रोडवर सध्या सर्वत्र अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बीड ...

Dirt in MSEDCL office premises | महावितरण कार्यालय परिसरात घाण

महावितरण कार्यालय परिसरात घाण

googlenewsNext

अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा

बीड : शहरातील जालना रोडवर सध्या सर्वत्र अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बीड पालिकेकडून मागील अनेक महिन्यांपासून यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर तात्काळ कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बालेपीर परिसरात आरोग्य केंद्र उभारा

बीड : शहरातील बालेपीर दक्षिणोत्तर बाजू आदित्यनगर, नवीन ईदगाह, हाऊसिंग कॉलनी, अंकुशनगर, ग्रामसेवक कॉलनी, अंबिका चौक, शिंदे वस्ती, गोरे वस्ती परिसर झपाट्याने विकसित होत आहे. लोकसंख्या व येथील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन बालेपीर परिसरात आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष मोहम्मद खमरोद्दीन यांनी केली आहे.

प्रशिक्षण केंद्रासमोर रिक्षा पार्किंग

बीड : आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक अनधिकृतपणे पार्किंग करीत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक शाखा पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Dirt in MSEDCL office premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.