लोणीसावंगी बंधाऱ्याच्या सात दरवाजांतून पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:25+5:302021-09-07T04:40:25+5:30
माजलगाव : बीड व जालना जिल्ह्यांत मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची मोठी आवक होत ...
माजलगाव : बीड व जालना जिल्ह्यांत मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची मोठी आवक होत असल्याने गोदावरीला पूर आला असून, नदीचे पात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे. तालुक्यातील लोणीसावंगी बंधाऱ्याचे १६ पैकी ७ दरवाजातून दुपारी एक वाजता ८७ हजार ७०३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.
लोणीसावंगी बंधारा या पूर्वीच तुडुंब भरून वाहू लागला होता. यातच शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे बंधाऱ्याचे दरवाजे उघडावे लागले. रविवारी या बंधाऱ्यातून ११ गेट मधून गोदावरी नदीच्या पात्रात १ लाख ५० हजार ३४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर सोमवारी दुपारी याच बंधाऱ्यातून ७ गेटमधून ८७ हजार ७०३ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.
060921\img_20210906_115047_14.jpg