शिरूरमध्ये लसीकरणाच्या वेळी घडले शिस्तीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:39+5:302021-05-09T04:34:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुक्यात गुरूवारी लस मला मिळाली पाहिजे यासाठी झुंबड उडाली होती. नियंत्रण ठेवण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यात गुरूवारी लस मला मिळाली पाहिजे यासाठी झुंबड उडाली होती. नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तहसीलदारांना ही आरोग्य केंद्रावर जावे लागले होते. मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मात्र वेगळे चित्र दिसून आले. १८ ते ४५ वयोगटातील तरूणांनी ऑनलाईन बुकिंग करून रांगेत उभे राहत सुरक्षित अंतराचे भान ठेवत एक शिस्तीचा आदर्श दाखवून दिला होता.
शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होताच गुरुवारी एकच गर्दी उसळली होती. सकाळपासून नागिरक केंद्रावर हजर झाले होते. परिणामी गर्दीवर नियंत्रण मिळवताना नियोजन कोलमडले होते. पहिला डोस व दुसरा डोस अशी दुहेरी गर्दी होती . १८ ते ४५ स्वत: ऑनलाईन नोंदणी केली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खाडे, डॉ. राहुल सानप, नितीन कैतके, लखूल मुळे, बाळासाहेब कराड, अभिमन्यू कातखडे यांच्यासह सिस्टर श्रीमती तोडेकरव कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.
...
दोन दिवसात १२०० जणांचे लसीकरण
गुरूवारी १५८ व शुक्रवारी १७० लस देण्यात आली. हेल्थ वर्कर पहिला व दुसरा मिळून १६ तर फ्रंट लाईन कर्मचारी ६, ज्येष्ठ नागरिक पहिला डोस १६८ व दुसरा डोस ९० असे एकूण २५८ तर ४५ ते ६० वयोगटात पहिला डोस २३२. दुसरा डोस ९० असे ३२२. दुसरा डोस ९० देण्यात आले. तालुक्यात शिरूर, खालापुरीत एकूण १२०० लोकांना लस देण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी अशोक गवळी यांनी सांगितले.
===Photopath===
080521\vijaykumar gadekar_img-20210507-wa0059_14.jpg