गावकारभाऱ्यांचा निरूत्साह; दोन दिवसात केवळ २९अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:32+5:302020-12-25T04:27:32+5:30
बीड : जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २९ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. बीड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमधून ८, गेवराई तालुक्यातून ...
बीड : जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २९ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. बीड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमधून ८, गेवराई तालुक्यातून ८, केजमधून ७, आष्टी तालुक्यातून ६ नामनिर्देशनत्र दाखल झाले. तर अंबाजोगाई, माजलगाव, परळी, धारूर, पाटोदा, शिरूर आणि वडवणी तालुक्यातून एकही अर्ज दाखल झाला नाही.
गेवराईत ८ अर्ज दाखल
गेवराई : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या १८६ जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवारी मादळमोहीतून २ अर्ज दाखल झाले होते. तर गुरूवारी जव्हारवाडीतून ६ तर मादळमोहीसाठी २ असे ८ अर्ज दाखल झाले.
आष्टीतून ६ अर्ज
तालुक्यातील डोईठाण येथील सहा उमेदवारी अर्ज २४ डिसेंबर रोजी दाखल झाल्याची माहिती प्रभारी तहसीलदार शारदा दळवी व नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी दिली आहे.
केज तालुक्यात सात अर्ज
केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतच्या एकाच पॅनलकडून सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आ ल्याची माहिती नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी दिली.
आष्टीतून ६ नामनिर्देशन पत्र
गुरुवार दि २४ डिसेंबर रोजी तालुक्यातील डोईठाण येथील सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार शारदा दळवी व नायब तहसीलदार प्रदीप पाडुळे यांनी दिली आहे.
तीन दिवस सुट्या, नंतर होणार गर्दी
नाताळ, शनिवार आणि रविवारी सलग तीन दिवस सुट्या असल्यामुळे उरलेल्या तीन दिवसांत निवडणूक यंत्रणेवर ताण येणार आहे. ऑनलाईन नामनिर्देशनपत्र दाखल करुन ऑनलाईन केलेली कागदपत्रे व अनामत रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावी लागते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे दोन दिवस ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करण्यात गेले. २८ ते ३० डिसेंबरपर्यंत निवडणूक कार्यालयात गर्दी होणार असल्याचे चित्र आहे.