केज उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांमध्ये वाद; बाचाबाचीत एकाने लगावली कानशिलात
By सोमनाथ खताळ | Published: November 14, 2022 12:33 PM2022-11-14T12:33:58+5:302022-11-14T12:37:22+5:30
हा प्रकार सर्व डॉक्टर, परिचारीकांच्यास समोर घडला.
बीड : रजेच्या कारणावरून वैद्यकीय अधीक्षक आणि अस्थिरोग तज्ज्ञ यांच्यात सकाळीच वाद झाले. एकाने तर दुसऱ्याच्या कानशिलात लगावल्याची खात्रिलायक माहिती आहे.
केजचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.संजय राऊत रजेवर आहेत. त्यामुळे येथील अतिरिक्त पदभार स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.केशव इंगोले यांच्याकडे दिलेला आहे. याच रूग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.ज्ञानेश्वर लांडगे यांच्या पदोन्नतीचा विषय असल्याने ते रजेवर गेले होते. परंतू रजा संपूनही ते परत आले नाहीत. याच मुद्यावरून दोघांमध्ये आगोदर शाब्दीक बाचाबाची झाली. बोलण्यातून वाद टोकाला गेल्याने एकाने तर दुसऱ्याच्या थेट कानशिलात लगावली. हा प्रकार सर्व डॉक्टर, परिचारीकांच्यास समोर घडला. याची नोंद आणखी पोलीस दफ्तरी झालेली नाही.
मी कोणाच्याही कानाखाली मारली नाही. उलट डॉ.लांडगे यांनीच मला शिवीगाळ केली आहे. आठ दिवसांपासून ते गायब होते. मी सध्या शस्त्रक्रिया गृहात आहे, नंतर बोलतो.
- डॉ.केशव इंगोले, प्र.वैद्यकीय अधीक्षक केज
हा वाद आमचा अंतर्गत आहे. घरगुती वाद असल्याने मला त्यावर काही बोलायचे नाही. मी आताच काही बोलू शकत नाही.
- डॉ.ज्ञानेश्वर लांडगे, अस्थिरोग तज्ज्ञ, केज