तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:27+5:302021-09-21T04:37:27+5:30

कीटकनाशक फवारणीबाबत जनजागृती सुरू अंबाजोगाई : पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू ...

Dispute-free village committees only on paper | तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

Next

कीटकनाशक फवारणीबाबत जनजागृती सुरू

अंबाजोगाई : पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करताना विषबाधा होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोणकोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात गावागावांत शेतकऱ्यांना माहिती देण्याची मोहीम गेल्या आठवडाभरापासून राबविण्यात येत आहे.

गढूळ पाण्याने नागरिक हैराण

अंबाजोगाई : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र शहरातील विविध वॉर्डात आजही गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्य धोक्यात आहे. शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

साबलखेड-आष्टी रस्त्यावर खड्डे खड्डेच

कडा : आष्टी तालुक्यातील साबलखेड-आष्टी या १५ किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डेच पडले आहेत. पावसाने हा रस्ता पार उखडून गेला असून, काही ठिकाणी तर चक्क रस्ताच वाहून गेला आहे. साबलखेडनजीक पुलावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे पूल खचण्याची भीती आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Dispute-free village committees only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.