मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 06:53 PM2021-01-07T18:53:38+5:302021-01-07T18:55:49+5:30

Approved the no-confidence motion against the Speaker : परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला बबन गित्ते यांच्या विरोधात पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 डिसेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

Dissatisfaction among members of the Panchayat Samiti in Dhananjay Munde's possession; Approved the no-confidence motion against the Speaker | मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देयावेळी एकूण 11 सदस्यांपैकी 10 सदस्य उपस्थित होते.तर सभापती उर्मिला गित्ते ह्या गैरहजर होत्या.

परळी : येथील पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्या विरोधात गुरुवारी पंचायत समिती सदस्यांच्या  विशेष सभेत अविश्वास ठराव संमत झाला. ठरावाच्या बाजूने 11 पैकी 10 सदस्यांनी हात उंच करून पाठिंबा दिला. तर सभापती स्वतः गैरहजर राहिल्या. यावेळी तहसिल परिसरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त होता.

परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला बबन गित्ते यांच्या विरोधात पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 डिसेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या ठरावावर विचार विनिमय करण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता परळी पंचायत समिती सदस्यांची एक विशेष सभा बोलवण्यात आली , पावणे आकरा वाजता तहसिल कार्यालयात  10 सदस्य आले. वेळेवर11 वाजता उपजिल्हाधिकारी तथा पीठासन आधिकारी नम्रता चाटे यांच्या उपस्थितीत विशेष सभेला प्रारंभ झाला. यावेळी एकूण 11 सदस्यांपैकी 10 सदस्य उपस्थित होते. तर सभापती उर्मिला गित्ते ह्या गैरहजर होत्या. त्यामुळे 10 सदस्यांनी  सभापती विरोधात अविश्वास ठराव हात उंच करून पारित केला. परळी तहसिल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता तसेच शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला होता. शांततेत अविश्वास ठरावाची प्रक्रिया पार पडली. 

राष्ट्रवादी आणि भाजप सदस्य एकत्र 
राष्ट्रवादी व भाजपाच्या सदस्यांनी एकत्रित येऊन सभापती उर्मिला गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित केला. या विशेष सभेकरीता पंचायत समिती, अंबाजोगाईचे  गटविकास अधिकारी एस.जी.घोनसीकर, परळीचे नायब तहसिलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते. उर्मिला गित्ते ह्या नंदागौळ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या. जनक्रांती सेनेचे संस्थापक बबन गीते यांच्या त्या पत्नी आहेत. डिसेंबर 2019 मध्ये त्यांची परळी पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाली होती. सभापतीपदाला एक वर्ष पूर्ण झाल्याने नवीन सदस्याला सभापती करण्यासाठी त्यांना पक्षाच्यावतीने सभापती पद सोडण्याची सांगितले होते. परंतु, त्यांनी पद न सोडल्यामुळे त्यांच्या वर अविश्वास ठराव आणला असल्याची चर्चा आहे.

Web Title: Dissatisfaction among members of the Panchayat Samiti in Dhananjay Munde's possession; Approved the no-confidence motion against the Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.