नेकनूर ते नांदूर रस्त्याची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:00+5:302021-02-15T04:30:00+5:30
नेकनूर : नेकनूर ते नांदूर रस्त्यावर गत काही वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. नेकनूर हे मोठ्या बाजाराचे गाव आहे. ...
नेकनूर : नेकनूर ते नांदूर रस्त्यावर गत काही वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. नेकनूर हे मोठ्या बाजाराचे गाव आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क असतो. मात्र, रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी रस्ता दुरूस्तीची मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.
मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : शहरातील सुभाष रोड, माळीवेस, धोंडीपुरा या भागामध्ये वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होऊन, वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत. वाहतूक शाखेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
नाल्यांची सफाई नाही, स्वच्छतेची मागणी
वडवणी : शहरातील अनेक भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, कचराही ठिकठिकाणी साचलेला दिसतो. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर पंचायतने विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे.
मोबाईल रेंज मिळेना, ग्रामीण ग्राहक त्रस्त
पाटोदा : तालुका आणि परिसरात बीएसएनएलच्या ग्राहकांना खंडित सेवेचा त्रास होत आहे. अनेकवेळा रेंज मिळत नसल्याने त्रास होत आहे. परिणामी वेळेत व तत्परतेने संपर्क होत नसल्याने खोळंबा होतो. संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.