पात्र शेतकऱ्यांना तीन लाखांचे कर्ज वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:26+5:302021-06-16T04:45:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : पात्र शेतकऱ्यांना तत्काळ ३ लाखांचे पीक कर्ज वाटप करावे, या प्रमुख मागणीसह विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : पात्र शेतकऱ्यांना तत्काळ ३ लाखांचे पीक कर्ज वाटप करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन बीड जिल्हा परिषदेचे सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवारी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मागण्या मान्य केल्या नाहीतर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
अंबाजोगाई तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना तत्काळ ३ लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात यावे. सर्व निराधारांचे मासिक वेतन त्यांच्या पूर्वीच्याच बँक खात्यावर जमा करून न्याय द्यावा. खते व बियाणांच्या किमतीपेक्षा चढ्या दराने होत असलेली विक्री बंद करण्यात यावी. मागील दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनेतील मंजूर अनुदान तत्काळ वाटप करण्यात यावे. सदरील सर्व मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर राजेसाहेब देशमुख, ईश्वर शिंदे, गणेश गंगणे, धनराज कोळगीरे, सतीश भगत, शेख हबीब, संजय वाघमारे, अक्षय कांबळे आदींच्या सह्या आहेत.