८० निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:52+5:302021-04-28T04:35:52+5:30

अंबाजोगाई : मानवलोक संस्थेच्या वतीने अंबाजोगाई शहर व परिसरातील जवळपास ८० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप घरपोच करण्यात आले. ...

Distribution of essential items to 80 destitute people | ८० निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

८० निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

googlenewsNext

अंबाजोगाई :

मानवलोक संस्थेच्या वतीने अंबाजोगाई शहर व परिसरातील जवळपास ८० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप घरपोच करण्यात आले. नंतरच्या काळातही मानवलोकचे हे कार्य सुरूच राहणार असल्याची माहिती कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी दिली.

कोरोना या महाभयंकर साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अंबाजोगाईत गेल्या काही दिवसापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. परिणामी जनजीवन ठप्प झाले असून मजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या हजारो मजूर आणि गोरगरिबांची उपासमारीची वेळ आली. त्यांच्यावर कोरोना संक्रमण काळ अतिशय वाईट काळ असून त्यात निराधार गोरगरीब आणि कष्टकरी वर्गांची चांगलीच तारांबळ उडत आहे. अशा काळात कोणीही उपाशी राहू नये, या उद्देशाने मानवलोक संस्थाच त्यांचा आधार बनून हरवत चाललेल्या माणसात माणुसकीचे दर्शन घडवत आहे. मानवलोकचे उपक्रम हे वंचित गरजूंना घटकांना न्याय देण्याची ,आपल्या कार्याची वेगळी छाप असलेल्या मानवलोक अशा काळात गरजूंना दिलेला आधार महत्त्वपूर्ण आहे. जवळपास ८० गरजू निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात आले. या कामी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली शाम सरवदे, अशोक केदार, दिलीप मारवाळ, संजना आपेट, सावित्री सगरे आदींचा पुढाकार होता

===Photopath===

270421\avinash mudegaonkar_img-20210425-wa0080_14.jpg

Web Title: Distribution of essential items to 80 destitute people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.