१०० गरजू कुटूंबांना किराणा किटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:00+5:302021-05-28T04:25:00+5:30

माजलगाव : श्री स्वामी समर्थ मार्गात अध्यात्माबरोबरच संस्कार, संस्कृती, सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. भारतीय संस्कृतीचे दर्शन व रक्षण ...

Distribution of grocery kits to 100 needy families | १०० गरजू कुटूंबांना किराणा किटचे वितरण

१०० गरजू कुटूंबांना किराणा किटचे वितरण

Next

माजलगाव : श्री स्वामी समर्थ मार्गात अध्यात्माबरोबरच संस्कार, संस्कृती, सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. भारतीय संस्कृतीचे दर्शन व रक्षण प्रत्येक केंद्रात घडते. कोरोनाकाळात समाजातील गरजू कुटुंबांसाठी मदतीचा छोटास यज्ञ आदर्श असून, समाजातील इतर घटकांनी या उपक्रमाचे अनुकरण करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले.

येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात कोविड-१९च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊनमुळे अनेक होतकरू कुटुंबांपुढे रोजगाराचे संकट उभे राहिले. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा १०० गरजू कुटुंबांना गुरूवारी केंद्रातील सेवेकऱ्यांच्या वतीने किराणा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी फराटे बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक तुकाराम येवले ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते. प्रारंभी पो. नि. फराटे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची आरती करण्यात आली. नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किराणा किटचे वितरण करण्यात आले. तुकाराम येवले म्हणाले, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात बालसंस्कार, स्वयंरोजगार यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. काळाची पावले ओळखून केंद्राने घेतलेल्या या उपक्रमाचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील महिला, तरूण, नागरिक सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

===Photopath===

270521\purusttam karva_img-20210527-wa0036_14.jpg

Web Title: Distribution of grocery kits to 100 needy families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.