१५० सफाई कामगारांना मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:48+5:302021-05-22T04:31:48+5:30
अंबाजोगाई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ...
अंबाजोगाई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील ५० महिला व १०० पुरुष सफाई कामगारांना शुक्रवारी मास्क वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले, कोरोना संकटकाळात दररोज अंबाजोगाई शहर व परिसरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. अशा १५० महिला व पुरूष कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांना एन-९५ मास्कचे वाटप करण्यात आले. मागील काही महिन्यांपूर्वीच गरजू कुटुंबांना किराणा साहित्य, अन्नधान्य वाटप करण्यात आले. मास्क, सॅनिटायझर वाटप केले. बीड जिल्ह्यातील परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्यात आली. गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत व साहाय्यता केली. राज्यात रक्ताचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार एक हजारच्या जवळपास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वेळोवेळी रक्तदान केले. प्रास्ताविक नगरसेवक महादेव आदमाने यांनी केले. आनंद टाकळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, नगरसेवक अमोल लोमटे, सुनील व्यवहारे, राणा चव्हाण, भारत जोगदंड, अमोल मिसाळ, प्रताप देवकर, सचिन जाधव, तसेच नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील प्रमुख श्रीकांत थोरात, भरत लखेरा, खाजगी कंत्राटदार प्रतिनिधी संजय कदम आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
210521\avinash mudegaonkar_img-20210521-wa0070_14.jpg