शेतकरी, हमाल, मापाडी, व्यापाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:13+5:302021-06-16T04:45:13+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी, हमाल आणि मापाडी बांधवांना ...
अंबाजोगाई :
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी, हमाल आणि मापाडी बांधवांना ८ जून रोजी मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले, अशी माहिती अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक गोविंदराव देशमुख यांनी दिली आहे. मंगळवारी बाजार समितीचे कार्यालयात आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक गोविंदराव देशमुख, अमर देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, व्यापारी प्रकाश सोळंकी, संचालक शेख अब्रार, विलास मोरे, दत्तात्रय यादव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कैलास गायकवाड, जावेद शेख, सुधाकर जोगदंड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यावेळेस बोलताना आ. संजय दौंड यांनी उपस्थित शेतकरी, व्यापारी, हमाल आणि मापाडी बांधवांना कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर नियमित मास्क व सॅनिटायझर वापरून फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून आपले दैनंदिन कार्य करावे, असे आवाहन केले.
मुख्य प्रशासक गोविंदराव देशमुख यांनी याबाबत सांगितले की, आज अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझर हे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच आणखीनही बाजार समितीच्या आवारात विनामास्क येणारे व सॅनिटायझर न वापरणाऱ्या अशा सुमारे ५ हजार लोकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे. शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, कामगार, व्यापारी, हमाल आणि मापाडी बांधवांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच समाजातील विविध घटकांना बांधिलकीतून सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मुख्य प्रशासक देशमुख म्हणाले.
जनतेने प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे. अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, व्यापारी, हमाल आणि मापाडी तसेच सर्व जनतेने नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, त्रिसूत्रीचे पालन करावे, समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटना आदींनी बीड जिल्हा प्रशासन, कोविड रुग्णालय, गरजू कुटुंबीय व व्यक्ती यांना सर्वतोपरी सहकार्य करावे.
-गोविंदराव देशमुख, मुख्य प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई.