कोविड रुग्णालयास १ लाख रुपयांच्या औषधींचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:32 AM2021-05-15T04:32:31+5:302021-05-15T04:32:31+5:30

अंबाजोगाई : शहरातील अक्षय मुंदडा मित्रमंडळ व वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात ...

Distribution of medicines worth Rs. 1 lakh to Kovid Hospital | कोविड रुग्णालयास १ लाख रुपयांच्या औषधींचे वितरण

कोविड रुग्णालयास १ लाख रुपयांच्या औषधींचे वितरण

Next

अंबाजोगाई : शहरातील अक्षय मुंदडा मित्रमंडळ व वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात १ लाख रुपयांच्या औषधीचे वितरण करण्यात आले. तर, शहरातील कोरोना योद्धांना ५०० फेस शिल्ड मास्क व २०० एन-९५ मास्कचे वितरण करण्यात आले. तसेच रुग्णालयास आवश्यक असणारे विविध साहित्य देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, तहसीलदार विपिन पाटील, कोरोना रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप घोन्सीकर उपस्थित होते.

अंबाजोगाई शहरात कोरोनाच्या काळात काम करणारे कोरोना योद्धे, पोलीस कर्मचारी, नगर परिषदेचे अंत्यविधी करणारे पथक, अन्नछत्र चालविणारे समाजसेवक, दूध विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक यांना वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने २ हजार मास्क, ५०० शिल्डचे वाटप करण्यात आले. तसेच, रुग्णालयास आवश्यक असणारे १० मोठे डस्टबीन, ग्लूकोमीटर, डायनाप्लास्ट, पाच डझन पेन, पाच डझन पेन्सिल, तीन डझन स्केल, दोन झेरोक्स रिम आदी अत्यावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी डॉ. गालफाडे, डॉ. हजारी, डॉ. समी, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, नगरसेवक सारंग पुजारी, शेख ताहेर, खालील मौलाना, बाळासाहेब पाथरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे. एड. संतोष लोमटे, अमोल पवार, प्रशांत आदनाक, अनंत अरसुडे, शरद इंगळे, गोपाळ मस्के आदी उपस्थित होते.

===Photopath===

140521\avinash mudegaonkar_img-20210513-wa0064_14.jpg

Web Title: Distribution of medicines worth Rs. 1 lakh to Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.