आज सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत निसर्गदूत पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:48+5:302021-08-14T04:38:48+5:30
सर्पराज्ञी तर्फे गेल्या दोन वर्षांपासून विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्मिळ अतिदुर्मिळ वृक्ष जतनासाठी सर्पराज्ञी दुर्मिळ अतिदुर्मिळ वृक्ष ...
सर्पराज्ञी तर्फे गेल्या दोन वर्षांपासून विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्मिळ अतिदुर्मिळ वृक्ष जतनासाठी सर्पराज्ञी दुर्मिळ अतिदुर्मिळ वृक्ष रोपवाटिका निर्माण करण्यात आली. या रोपवाटिकेसाठी विविध प्रकारच्या दुर्मिळ अतिदुर्मिळ वृक्ष बीज संकलनासाठी सहकार्य केलेल्या निसर्गप्रेमींना निसर्गदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या वर्षीचा निसर्गदूत पुरस्कार वायवर्ण या अतिदुर्मिळ वृक्ष बीज संकलनासाठी रेणापूर- लातूर येथील शिवशंकर चापुले, संदीप राठोड मांडवे-अहमदनगर, पिवळी काटेसावर दीपक पाटील माकूनसार पालघर, पांढरा पळससाठी रवींद्र मुंडे वडवणी -बीड, कृष्णवड शाल्मली नलावडे पुणे, पिवळा पळस-जालिंदर भस्करे बीड, कुसूंब- दीपक थोरात मुगगाव -बीड, काटेसावर-डॉ. लहू थोरात मुगगावं-बीड, चारोळी-पवन भिंगारे झापेवडी-बीड, कैलासपती-विजयकुमार गाडेकर शिरूर कासार-बीड, सर्पमित्र महेश औसरमल शिरूर कासार-बीड यांची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीवृक्ष,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
सर्पराज्ञीत पुरस्काराचे वितरण
१४ऑगस्ट २०२१ रोजी ‘गंगाई नक्षत्रवन’ सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव .ता. शिरूर कासार,जि. बीड येथे सकाळी १०:०० वाजता विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांच्या हस्ते पुरस्कार्थींना गौरविण्यात येईल असे सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले.