‘माणुसकीची भिंत’च्या माध्यमातून गरजूस मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:16+5:302021-01-02T04:27:16+5:30

आजपर्यंत माणुसकीची भिंतच्या माध्यमातून गरजू गरीब विद्यार्थ्यांना ६४ सायकलींचे वाटप करण्यात आले आहे व एक लुना गाडी गरजूला मोफत ...

Distribution of needy free flour mills through ‘Wall of Humanity’ | ‘माणुसकीची भिंत’च्या माध्यमातून गरजूस मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप

‘माणुसकीची भिंत’च्या माध्यमातून गरजूस मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप

Next

आजपर्यंत माणुसकीची भिंतच्या माध्यमातून गरजू गरीब विद्यार्थ्यांना ६४ सायकलींचे वाटप करण्यात आले आहे व एक लुना गाडी गरजूला मोफत देण्यात आली आहे. या कार्यास जितेंद्र भोसले यांनी विशेष सहकार्य केले. मोहोळकर ज्ञानेश्वर, नगराध्यक्ष गणेश नारायणकर, रामदास भाकरे, माउली दुसाने, शहनवाज सय्यद, डॉ. लक्ष्मण जाधव, बाप्पा हुले, संजय पेचे, सचिन दाताळ, जायभाय, चौगुले कैलास फौजी, अमोल नारायणकर, संतोष गचांडे, दिवाकर खंडागळे, नागरे, नितीन जगदाळे आदींनी मदत केली आहे. ही पिठाची गिरणी ही २१ हजार रुपयांची असून, १५ हजार रुपये लोकसहभागातून जमा झाले आहेत व ६ हजार रुपयांची आणखी गरज असून, मदत करावी असे आवाहन ‘माणुसकीची भिंत’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमास उपस्थित अरुण पवार (मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष), अरुण गवळी, राजू जाधव, कल्याण खंडागळे, सतीश दळवी, राजू काका खंडागळे, अक्षय अडसूळ, बाबू सोवासे, तडवळकर काका, सुनील पोकळे, पै. बाळासाहेब आवारे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Web Title: Distribution of needy free flour mills through ‘Wall of Humanity’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.