शंभर महिलांना शिधापत्रिकांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:13+5:302021-01-18T04:30:13+5:30

अंबाजोगाईत जनसहयोगचा पुढाकार अंबाजोगाई : येथील जनसहयोग व तहसील कार्यालयातर्फे शंभर महिलांना बीपीएल व केसरी शिधापत्रिका वितरीत करण्यात ...

Distribution of ration cards to one hundred women | शंभर महिलांना शिधापत्रिकांचे वितरण

शंभर महिलांना शिधापत्रिकांचे वितरण

googlenewsNext

अंबाजोगाईत जनसहयोगचा पुढाकार

अंबाजोगाई : येथील जनसहयोग व तहसील कार्यालयातर्फे शंभर महिलांना बीपीएल व केसरी शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या. यात विधवा, परित्यक्ता व सर्वसाधारण महिलांचा समावेश होता. मोठ्या प्रतीक्षेनंतर शिधापत्रिका मिळाल्याचा आनंदही महिलांच्या चेहऱ्यावर होता.

तहसील कार्यालयाचा एखादा कागद किंवा प्रमाणपत्र काढायचे म्हटले की सर्वसामान्यांना अनेक चकरा माराव्या लागतात. परंतु मानवलोक जनसहयोगने महिलांवर ही वेळ न येऊ देता शिधा पत्रिकांच्या कागदपत्रांची पूर्तता करीत तहसील कार्यालयाकडे अर्ज दाखल केले. यासाठी फक्त ५५ रुपये शासनाचे चलन भरून ते उपलब्ध करून देण्यात आले. याच शिधापत्रिका एकत्रित शंभर महिलांना वितरीत करण्यात आल्या.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी, नायब तहसीलदार गणेश सरोदे, किशोरी मुंडे, प्रगतशील शेतकरी विद्या रुद्राक्ष, प्रशांत बर्दापूरकर, दत्तात्रय अंबेकर यांच्यासह कल्पना लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती. इनरव्हील क्लबच्या सुहासिनी मोदी कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या. यावेळी नगराध्यक्षा रचना मोदी, विद्या रुद्राक्ष, सुहासिनी मोदी यांचीही भाषणे झाली. कल्पना लोहिया व श्याम सरवदे यांनी जनसहयोगच्या उपक्रमांची माहिती दिली. लाभार्थी सय्यद बिलाल व महादेवी राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजना आपेट यांनी केले. सावित्री सागरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी दिलीप मारवाळसह जनसहयोगच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

गरजूंना मदतीसाठी प्रयत्न

मानवलोकचे काम मी लहानपणापासून पहात आलो असून शासनाची मदत योग्य व गरजू व्यक्तींना पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या पुढील काळातही आपण मानवलोक व जनसहयोगला सहकार्य करण्याची ग्वाही नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी दिली.

Web Title: Distribution of ration cards to one hundred women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.