मजुरांना रेशन कीटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:32 AM2021-07-29T04:32:58+5:302021-07-29T04:32:58+5:30
ऊसतोड मजुरांना लॉकडाऊनमध्ये खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. हाताला काम मिळाले नाही. कुटुंबात उपासमार सुरू झाली होती. मुलाबाळांचा ...
ऊसतोड मजुरांना लॉकडाऊनमध्ये खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. हाताला काम मिळाले नाही. कुटुंबात उपासमार सुरू झाली होती. मुलाबाळांचा जगण्याचा प्रश्न गंभीर होता .शासनाकडूनही मदत मिळत नव्हती, मात्र या मजुरांच्या अडचणींचा विचार करून जनसाहस संस्था व ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्यावतीने कारी २८ व पहाडी पारगाव येथील ३२ मजुरांना रेशन कीट वाटप करण्यात आल्या. या संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून, अशा गरजू लोकांना आधार देण्याचे काम करून संकटकाळी धावून आले आहेत. या मदतीमुळे मजुरांना समाधान वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या कार्यक्रमात मजुरांना असणाऱ्या विविध शासकीय योजना व त्यासाठी लागणारे कागदपत्र व मजुरांना येणाऱ्या विविध अडचणी यासाठी असणाऱ्या हेल्पलाईनचीही माहिती देण्यात आली. या संस्थेचे जिल्हा समन्वयक परमेश्वर आडागळे व सर्व टीमने या रेशन वाटपाचे नियोजन केले.