विद्यार्थ्यांना तांदूळ , हरभरा, मूग डाळीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:47+5:302021-07-15T04:23:47+5:30

२४.८६ किलो तांदूळ ,७.७८ किलो मूगडाळ तर ५.८१ किलो हरभरा वाटप शिरूर कासार : येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय ...

Distribution of rice, gram, green gram to the students | विद्यार्थ्यांना तांदूळ , हरभरा, मूग डाळीचे वाटप

विद्यार्थ्यांना तांदूळ , हरभरा, मूग डाळीचे वाटप

Next

२४.८६ किलो तांदूळ ,७.७८ किलो मूगडाळ तर ५.८१ किलो हरभरा वाटप

शिरूर कासार : येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय व कन्या प्रशालेच्या ६६३ विद्यार्थ्यांना मंगळवार, बुधवारी दोन दिवसात जून व जुलै महिन्याच्या चाळीस दिवसांचे तांदूळ ,मूगडाळ व हरभरा वाटप करण्यात आला .

कन्या प्रशालेत १८५ मुलींना प्रती विद्यार्थी एक ते पाच पर्यंत ४ किलो तांदूळ ,५०९ ग्रॅम मूगडाळ व १ किलो हरभरा तर ६ वी ते आठवी पर्यंतच्या मुलींसाठी ६ किलो तांदूळ ,८०० ग्रॅम मूगडाळ व २.४०० ग्रॅम हरभरा या परिमाण प्रमाणे ८.५० तांदूळ ,१.२५ मूगडाळ तर हरभरा ३.५० किलो वाटप केला असल्याची माहिती मुख्याध्यापक उद्धव जायभाये यांनी सांगितले .

याच परिमाण प्रमाणे जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या ४७८ विद्यार्थ्यांना १६.३६ किलो तांदूळ ,६.५३ किलो मूगडाळ व २.३१ किलो हरभरा दोन दिवसात वाटप केल्याची माहिती मुख्याध्यापक अंकुश शिंदे यांनी सांगितली .

शासनाकडून मिळत असलेल्या लाभापासून कुठलाही लाभार्थी वंचित राहू नये याची पुरेपूर दक्षता घेतली जात असल्याचे जायभाये व शिंदे यांनी सांगितले .

140721\img20210714124012.jpg

फोटो

Web Title: Distribution of rice, gram, green gram to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.