लमाणवाडी तांडा येथे शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:03 AM2021-02-18T05:03:11+5:302021-02-18T05:03:11+5:30
हारकी निमगाव : माजलगाव तालुक्यातील लमानवाडी तांडा, राजेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त शालेय साहित्य ...
हारकी निमगाव : माजलगाव तालुक्यातील लमानवाडी तांडा, राजेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक माणिक राठोड, सहशिक्षक श्रीकांत राठोड, दयावान रॉयल फाऊंडेशनचे भाऊ चव्हाण, सिद्धार्थ नाईक, राठोड, सुंदर जाधव, विष्णू जाधव, दगडू जाधव, अमोल चव्हाण, पवन राठोड, प्रदिप राठोड, विलास जाधव उपस्थित होते.
चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
बीड : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर ठाणे हद्दीत चोरीच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी संशयित इस असल्याचे नागरिकांनी कळविले आहे. चोरट्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन अंमळनेर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी केले आहे. या ठाणे हद्दीतील नागरिकांनी सध्या पिकांच्या मळणीकडे लक्ष ठेवावे, धान्य चोरी होऊ नये, यासाठी संशयित इसम दिसल्यास चौकशी करावी तसेच नागरिकांनी चोरट्यांपासून सतर्क रहावे, असे आवाहन डोंगरे यांनी केले आहे.
चोरीच्या घटना वाढीने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लहान-मोठ्या चो-यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे घराला कुलूप लावून गेल्याने चोरट्यांना आयतेच रान मिळाले. परिणामी घरफोड्या वाढल्या. तसेच मोटारसायकलची शहरात मोठ्या प्रमाणात चोरी वाढली आहे. या वाढत्या चो-यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा व रात्रीची वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष