नेत्र शिबिरातील ५० रुग्णांना चष्म्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:19+5:302021-03-01T04:38:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संगणकयंत्राद्वारे मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात बीड येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संगणकयंत्राद्वारे मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात बीड येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. वसुधा जाजू यांच्या हस्ते डोळेे तपासण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण २२० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी करणाऱ्या तज्ज्ञांनी डोळ्यांच्या विविध विकारांचे निराकरण केले. शिबिरात तपासणी झालेल्या ३२ जणांना मोतिबिंदू ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला. त्यापैकी १५ जणांनी मोतिबिंदू ऑपरेशन केले. गरजू ५० रुग्णांना नितीन शिनगारे यांच्यावतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी दक्षता कमिटीचे अध्यक्ष शाकेर अली सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, गौतम चव्हाण, गणेश सावंत, प्रदीप नेहरकर, सय्यद रज्जाक, सुरज कोमटवार, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश थोरात, विश्वास शिनगारे, धम्मा गायसमुद्रे, सुरेश खेपकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
धारूरमध्ये मोतिबंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
===Photopath===
280221\28bed_10_28022021_14.jpg