पालावरील नागरिकांना गव्हाचे पीठ, तांदळाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:05+5:302021-05-14T04:33:05+5:30

पालावर राहणाऱ्या कुटुंबातील गरोदर, लेकुरवाळ्या महिलांची कोरोनाकाळात उपासमार होत असताना आणि सरकारने या लोकांची रेशनची सोय न ...

Distribution of wheat flour and rice to the citizens of Pala | पालावरील नागरिकांना गव्हाचे पीठ, तांदळाचे वाटप

पालावरील नागरिकांना गव्हाचे पीठ, तांदळाचे वाटप

Next

पालावर राहणाऱ्या कुटुंबातील गरोदर, लेकुरवाळ्या महिलांची कोरोनाकाळात उपासमार होत असताना आणि सरकारने या लोकांची रेशनची सोय न करता वाऱ्यावर सोडत लॉकडाऊन वाढवले. याचा परिणाम या भटक्या लोकांच्या उपासमारीच्या समस्या वाढण्यात झाला. यासाठी निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या प्रमुख सत्यभामा सौंदरमल यांनी अनेक संस्थांच्या कानावर ही बाब घालून मेलद्वारे कळविले. यातून बिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे यांनी लागलीच एक टन गव्हाचे पीठ आणि एक टन तांदूळ असे एक टेम्पो रेशन पाठविले. सध्या या रेशनचे वाटप जिल्ह्यातील वेगवेगळ्या पालवस्त्यांवर राहणाऱ्या लोकांबरोबरच एकल महिला, बेवारस, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा, गरोदर माता यांना सुरू असून, गुरुवारी माजलगाव शहरातील पालांवर याचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण डावरे, संस्थेच्या कार्यकर्त्या भारती सौंदरमल आदी उपस्थित होते.

===Photopath===

130521\purusttam karva_img-20210513-wa0025_14.jpg

Web Title: Distribution of wheat flour and rice to the citizens of Pala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.