तेलगावच्या नियोजित कोविड केअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:29+5:302021-05-05T04:55:29+5:30
: तेलगाव येथील ट्रामा केअर युनिटमध्ये होणाऱ्या नियोजित कोविड सेंटरला मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व जि. प. मुख्य ...
: तेलगाव येथील ट्रामा केअर युनिटमध्ये होणाऱ्या नियोजित कोविड सेंटरला मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी भेट देऊन पाहणी केली व नंतर आढावा घेतला.
तेलगाव येथे ट्रामा केअर युनिट गेल्या १२ वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. परंतु आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे येथे अद्यापपर्यंत ट्रामा केअर युनिट चालू झाले नाही. सध्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोविड सेंटर फुल्ल होत आहेत. अशा बिकट परिस्थितीत तेलगाव येथील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीत कोविड सेंटर चालू करण्याबाबत तेलगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे आरोग्य विभागाने येथे कोविड केअर सेंटर चालू करण्यासाठी मंजुरी दिली. त्याप्रमाणे येथील आवश्यक कामे तात्काळ करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. या नियोजित कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी सोमवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिल्यानंतर आठ दिवसांत सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी संयुक्त दौरा करून तेलगाव येथील नियोजित कोविड सेंटरचे काम कुठपर्यंत आले, तसेच आवश्यक व सांगितलेली कामे वेगाने सुरू आहेत का? आणखी कशाची आवश्यकता आहे, याचा आढावा त्यांनी घेतला. आरोग्य विभागाने गतीने अवश्यक ती कामे पूर्ण करून घेऊन, तात्काळ कोविड सेंटर चालू करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी आदेश दिले.
फोटो ओळी : तेलगाव येथील ट्रामा केअर युनिटमध्ये होणाऱ्या नियोजित कोविड सेंटरची मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व जि प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पाहणी केली.
===Photopath===
040521\anil mhajan_img-20210504-wa0076_14.jpg